Home महाराष्ट्र डॉक्टर आंबेडकर यांच्या निवासस्थानी तोडफोड, राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया

डॉक्टर आंबेडकर यांच्या निवासस्थानी तोडफोड, राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया

0

काल रात्री अज्ञात व्यक्तींनी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील “राजगृह” या निवासस्थानी तोडफोड केली आहे. तेथील सिक्युरिटी कॅमेरे, खिडक्या आणि कुंड्यांची तोडफोड करण्यात आली असून ही घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

बाबासाहेबांनी हे निवासस्थान विशेष पुस्तकांसाठी बांधले होते, या ठिकाणी असलेल्या पुस्तकांच्या संग्रहामध्ये जगभरातील दुर्मिळ ग्रंथ आहेत. जगभरातील लोक हा पुस्तकांचा दुर्मिळ खजिना बघण्यासाठी येथे भेट देतात. काल संध्याकाळी दोन माथेफिरू लोकांनी ही तोडफोड केली असून पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

दरम्यान राज्यामध्ये सरकार आणि सर्व राजकीय नेत्यांनी सदर घटनेचा निषेध केला असून सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे. अजित पवार यांनी कडक पोलीस चौकशी सुरू असल्याचे जाहीर केले असून , सर्वांनी शांतता ठेवा असे आवाहन केले आहे. तसेच फडणवीस यांनी सुद्धा निषेध दर्शवत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.