Home महाराष्ट्र व्हिडीओ शुटींग बंद झाल्याशिवाय कीर्तन करणार नाही : इंदोरीकर

व्हिडीओ शुटींग बंद झाल्याशिवाय कीर्तन करणार नाही : इंदोरीकर

0
indurikar maharaj

वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या इंदोरीकर महाराजांनी नुकताच झालेल्या या वादानंतर प्रथमच नगरमधील भिंगार शहरात एका कार्यक्रमात हजेरी लावली. लोकमतच्या एका रिपोर्टनुसार यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षारक्षक तैनात होते. नुकत्याच झालेल्या वादानंतर त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना खूप मानसिक त्रासाचा सामना करावा लागला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोबतच उपस्थित लोकांना त्यांनी कॅमेरे बंद करण्याची विनंती केली. सर्व कॅमेरे बंद झाल्यानंतरच त्यांनी कीर्तनाला सुरुवात केली.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार गर्भलिंग निदानाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या गर्भलिंग निदान विरोधी समितीने इंदोरीकरांना नोटिस बजावलेली असून त्यानंतर अर्थात शनिवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी भिंगार येथे शुक्लेश्वर मंदिरात त्यांचा हा पहिलाच किर्तनाचा कार्यक्रम झाला. कीर्तन संपल्यानंतर ते म्हणाले, “झाल्या प्रकरणामुळे माझ्या कुटुंबाला खूप त्रास झाला. माझ्या मुलीला देखील शाळेत जाता नाही आलं.” त्याच बरोबर झाल्या प्रकारांमुळे महिलांच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांनी जाहीर माफी देखील मागितली. पुढे ते हेही म्हणाले की, “मी भागवत, ज्ञानेश्वरी, गीता आदी आपल्या धार्मिक आणि पौराणिक ग्रंथातील ज्ञान कीर्तनातून सांगत असतो. ते चुकीचे कसे असेल?” असा प्रश्न देखील यावेळी इंदोरीकर यांनी केला अशी माहिती मिळत आहे.