Home महाराष्ट्र मराठा क्रांती मोर्चाचे विनोद पाटील म्हणतात MPSC मध्ये मोठा झोल, पुन्हा पेपर...

मराठा क्रांती मोर्चाचे विनोद पाटील म्हणतात MPSC मध्ये मोठा झोल, पुन्हा पेपर चेक करा!

0

नुकताच जाहीर करण्यात आलेला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (एमपीएससी) निकाल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे, मराठा क्रांती मोर्चाचे नेते विनोद पाटील यांनी एमपीएससीच्या निकालात अनियमितता असल्याचा गंभीर आरोप केला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून निकाल पुन्हा तपासण्याची मागणी केली आहे. त्यामुळे एमपीएससी निकालाचा पेच भविष्यात वाढणार असल्याचं दिसत आहे. मराठा आरक्षण मुळे १२७ मराठा तरुण अधिकारी झाले आहेत.

या निकालात जवळपास 30 अधिकाऱ्यांना नव्या निकालात जुन्याच ठिकाणी नियुक्ती दिल्याची माहिती विनोद पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे आता या प्रश्नावर महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि राज्य सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

विनोद पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे, ‘एमपीएससीच्यावतीने 2019 मध्ये परीक्षा घेण्यात आल्या. यामध्ये अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्याला नवे अधिकारी मिळाले. परंतू यात एक नैराश्य आणणारी बाब म्हणजे यातील 30 पेक्षा अधिक अधिकारी राज्य सरकारच्या सेवेत रुजू आहेत. या अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा 2019 च्या लेखी परीक्षा आणि तोंडी परीक्षांमध्ये भाग घेतला आणि उत्तीर्ण झाले. मात्र, जे अधिकारी आधी उपजिल्हाधिकारी होते, ते पुन्हा उपजिल्हाधिकारी झाले. जे तहसिलदार होते पुन्हा तहसिलदार झाले. यामुळे राज्य सरकारचा वेळ वाया गेला. परीक्षेचा खर्च वाया गेला. यातून महाराष्ट्र लोकसेवा आयोग अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न करत आहे.’

आयोगाने एमपीएससीच्या निकालात जुन्याच अधिकाऱ्यांची त्याच पदावर निवड केल्याचा दावा विनोद पाटील यांनी केला आहे.