Home महाराष्ट्र वंचितच्या बंदला हिंसक वळण : बसवर दगडफेक

वंचितच्या बंदला हिंसक वळण : बसवर दगडफेक

0

वंचित’कडून आज ‘महाराष्ट्र बंद’ पुकारण्यात आला. प्रकाश
आंबेडकर यांनी या बंदची घोषणा केली होती. १६ जानेवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते की, “देशात एनआरसी आणि सीएए विरोधात प्रचंड रोष आहे. सरकार दडपशाही करून हा कायदा लागू करू पाहत आहे.” त्याकरिताच हा बंद पुकारण्यात आला. प्रकाश आंबेडकर यांनी “बंद दरम्यान कुणीही गोंधळ घालू नये, अथवा सर्वसामान्य जनतेला व व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही तसेच, सरकारी वा खासगी मालमत्तेचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी” असे आवाहन केले होते. मात्र वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या बंदला मुंबई आणि सोलापुरात हिंसक वळण आल्याची माहिती मिळत आहे.

प्रभातच्या एका रिपोर्ट नुसार सोलापुरात महापलिका परिवहनच्या बसवर आज दगडफेक करण्यात आली. दरम्यान सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही वा कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या हिंसक बंद मुळे परिसरात गोंधळ उडाला. दुसरीकडे मुंबईतील चेंबूर भागात बेस्टच्या बसवर दगडफेक करण्यात आली अशी माहिती मिळत आहे. परिणामी आजूबाजूच्या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. “या बंदला हिंसक वळण देऊ नये” असे पुन्हा एकदा डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी आवाहन केले आहे.