Home महाराष्ट्र ‘या’ गावात कुठलंही बटन दाबलं तरी मत भाजपलाच!

‘या’ गावात कुठलंही बटन दाबलं तरी मत भाजपलाच!

0

धडाकेबाज प्रचारानंतर आणि भरभरून टीका व आश्वासनांच्या पावसानंतर शेवटी निवडणुकीची रणधुमाळी काल पार पडली. मात्र यंदाच्या मतदानातही एका ठिकाणी ईव्हीएममध्ये घोळ असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरेगाव मतदारसंघातील नवलेवाडी गावातील मतदान केंद्रावरील ईव्हीएममध्ये घोळ असल्याचे लक्षात आले. मीडिया न्यूज नुसार केंद्रावरील ईव्हीएमवर कुठलंही बटण दाबलं तरी मत कमळ या चिन्हालाच जात होतं. सदर गावकऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना सांगितले. तांत्रिक अडचण लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनीही ताबडतोब ईव्हीएम मशीन बदलून दुसरं मशीन बसवलं.

अधिक मिळालेल्या माहितीनुसार सकाळी अकराच्या सुमारास मतदारांच्या ही गोष्ट लक्षात आली. तोवर सुमारे दोनशेच्या जवळपास मतदारांनी मतदान केलं होतं. जेव्हा अधिकाऱ्यांकडे गावकऱ्यांनी तक्रार केली तेव्हा सुरुवातीला अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असे गावकरी सांगतात. परिणामी चिडलेल्या लोकांस शांत करण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागली. शेवटी तांत्रिक बिघाड मतदार अधिकाऱ्यांनी मान्य केला व दुसरं मशीन ताबडतोब बसवण्यात आलं.