रविवारी अर्थात काल मुंबईमध्ये पाकिस्तानी व बांगलादेशी घुसखोरांना देशातून हुसकावून लावण्याच्या मागणीसाठी मनसेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चानंतर आझाद मैदानावर सभा आयोजित करण्यात आली. या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी CAA विरोधात आंदोलन करणाऱ्या मुस्लिम समाजाला व नागरिकांना फौलावर घेतलं. Zee 24 तास च्या एक रिपोर्ट नुसार एकंदरीत सर्व परिस्थिती पाहता येत्या काळात राज ठाकरे यांची हिंदुत्ववादी भूमिका आणखी प्रखर होईल असं म्हटलं जातं आहे.
या भव्य मोर्चा व सभेमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा पेटली. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारले असता त्यांनी कोणतेही थेट भाष्य करणे टाळले. मात्र प्रतिउत्तरही दिले, “आमचे हिंदुत्व शुद्ध आहे. आम्हाला स्वत:ला सिद्ध करण्याची गरज नाही, मी माझ्या पक्षाच्या झेंड्याचा रंग बदललेला नाही. आमचे हिंदुत्व काय आहे ते जगाला माहिती आहे” असं उद्धव ठाकरे म्हटले.