विद्यपीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी केंद्रीय गृह खात्याने परवानगी दिल्यानंतर राज्यात परीक्षांच्या विरोधात उभे ठाकलेले ठाकरे सरकार काय भूमिका घेणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले होते. मंत्री उदय सामंत यांनी आज स्पष्ट केले की आम्ही विद्यार्थ्यांच्या हितासाठी काही झालं तरी परीक्षा घेऊ देणार नाही. कुठलेही राजकारण न करिता विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय आपण घेणार आहोत असे उदय सामंत यांनि स्पष्ट केले आहे.
कोरोनाचा विस्फोट झाल्यामुळे महाराष्ट्रात परीक्षा घेणे शक्य नाही तसेच आम्ही परीक्षा घेऊ देणार नाहीत, विद्यापीठ आयोग म्हणजेच UGC ने सदर बाबीची नोंद घ्यावी आणि जर आयोग त्यांच्या भूमिकेवर ठाम असेल तर त्यांनी परीक्षा कशा घ्याव्यात यासाठी नियमावली जाहीर करावी.असे मत उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतले आहे.
राज्य सरकार तसेच पालक आणि विद्यार्थी खालील प्रशांची उत्तरे UGC कडून मागत आहेत,
(१)कंटेन्मेंट झोन मधील विद्यार्थ्यांना परीक्षेला कसे आणायचे
(२) परीक्षा घ्यायची तर किती लोकांची batch असायला हवी
(३) पेपर कुठून छपाई करायचे?
(४) पेपर तपासणार कोण, पेपर मधून कोरोना जाणार नाही याची खात्री कोण घेणार
(५) शिक्षक, प्राध्यापक आणि परीक्षार्थी यांचे सोशल डिस्टन्स कसे पाळणार?