Home महाराष्ट्र लॉकडाऊनमधील वीज बिल आम्ही भरणार नाही; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

लॉकडाऊनमधील वीज बिल आम्ही भरणार नाही; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

0

लॉकडाऊनच्या काळात सर्वच नागरिकांचे घरगुती बिल नेहमीपेक्षा जास्त आले असल्याने महावितरण विभागाबद्दल संताप व्यक्त होत आहे. अशातच माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापुरातील महावितरणच्या ऑफिससमोर धरणे आंदोलन केले. त्यावेळी “लॉकडाऊनच्या काळातील वीज बिल आम्ही भरणार नाही, मग तुम्ही काय वाटेल ते करा” अशा शब्दांत महावितरण विभागाला इशारा दिला आहे. या आंदोलनात ज्येष्ठ नेते प्रताप होगाडे हेदेखील होते.

आंदोलनाच्या वेळी बोलतांना राजू शेट्टी पुढे म्हणाले, “आम्ही चंद्र, सूर्य, तारे, ताजमहाल असं काही मागितले नाही; आम्ही फक्त या कठीण परिस्थितीत आमची वीज बिले माफ करा एवढीच मागणी करत आहोत. गेल्या चार महिन्यांपासून लोक घरातच बसून आहेत. लोकांना काहीच काम नसल्याने पैसाही नाही. अशा परिस्थितीत त्यांनी हे वाढीव बिल कसं भरायचं? तसेच घरगुती वीज बिल ग्राहक बिलात सवलत मागत असल्याची ही देशभरातील पहिलीच वेळ आहे.”

याशिवाय “वीज बिल माफ करा म्हणून अनेक चर्चा केल्या व निवेदने ही दिली. मात्र आता वीज बिल माफ केले नाही तर पुढील आंदोलन वेगळ्या स्वरूपाचे असेल.” असा इशारा राजू शेट्टी यांनी महावितरणाला दिला आहे.