Home महाराष्ट्र “जेव्हा मी पक्षाचं काम सुरू केलं तेव्हा हे सगळे चड्डीत मुतायचे, आणि...

“जेव्हा मी पक्षाचं काम सुरू केलं तेव्हा हे सगळे चड्डीत मुतायचे, आणि आज…” : एकनाथ खडसे

0

भाजपचे महाराष्ट्रातील जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा विधानसभा निवडणुकीपासून पक्षावरील रोष सुरूच होता आता मात्र विधानपरिषदेवर सुद्धा त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे खडसे यांचा पारा प्रचंड चढता आहे.

एका मुलाखतीदरम्यान खडसे यांना प्रश्न विचारण्यात आला की, ” पक्षांमधील काही लोकांकडून तुम्हाला डावलन्याचा प्रयत्न होतो आहे का?”

या प्रश्नावर उत्तर देतांना एकनाथ खडसे म्हणाले, “भारतीय जनता पार्टीमधील काही व्यक्ती मला जाणीवपूर्वक बाहेर ढकलण्याचा प्रयत्न नेहमी करत आहेत. मला वारंवार छळलं गेलं. बदनाम करण्याचा प्रयत्न सतत झाला. या निमित्ताने का होईना मी पक्षाबाहेर पडेल. पक्षामधला एक प्रमुख स्पर्धक आहे, तो कमी होईल. परंतु, मी पक्षाच्या ध्येय धोरणांशी आणि निष्ठेशी प्रामाणिक राहिलो आहे. पक्षामध्ये मी ज्यावेळी कामाला सुरूवात केली. आताचे नेते तेव्हा अर्धी चड्डी घालून, तर काहीजण चड्डीसुद्धा घालत नव्हते. काहीजण चड्डीत मुतायचे अशी स्थिती होती. आम्ही तेव्हापासून काम करत आहोत. अशा स्थितीत ज्या पक्षाशी आमची आपुलकी आहे. बांधिलकी आहे. त्यामुळे एकाएकी पक्ष सोडणं हे मला पटणार नव्हतं”.

“दुसरीकडं काही नेत्यांना तर वाटत होतं की, मला असंच छळत राहायचं. तिकीट द्यायचं नाही. बदनाम करायचं. अपमान करायचा. त्यामुळे जनतेमध्ये अशी भावना झाली की, नाथाभाऊ इतका अपमान का सहन तरी कसा करू शकतात? आजही हजारो कार्यकर्त्यांचे मला फोन येत आहे की, कशासाठी पक्षामध्ये राहत आहात. लोकांची भावना बदलत चालली आहे, पण मी पक्षाचं प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी हे सहन करत आलो आहे. पण, यालाही काही मर्यादा आहेत”, अशा शब्दात नाथाभाऊनी आपली भूमिका स्पष्ट केली.