हा व्हिडीओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचं कॅमेऱ्या मागचं सत्य! सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. ज्यात जितेंद्र आव्हाड त्यांच्या मुंब्रा-कळवा मतदारसंघातील विकासकामांची माहिती दत्त आहेत व पूर्वीची व आताची परिस्थिती जीव तोडून सांगत आहेत. मात्र व्हिडिओ स्क्रीप्ट बोलून झाल्यानंतर ते जे काही बोलले त्याने महाराष्ट्च्या राजकारणात खळबळ माजवली आहे.
आव्हाड म्हणाले “एवढं नाटक दुसरं कोण करू शकेल का? रिटेक न घेता…” भाजपच्या एका समर्थक फेसबुक पेजने हा व्हिडीओ व्हायरल केला. शूट पूर्ण झाल्या नंतरही व्हिडीओ शूट चालू राहिल्याने आव्हाडांचं नाटकी संभाषण पुढे आलं. परिणामी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मीडिया रिपोर्ट नुसार निवडणुक काळात राबविण्यात आलेल्या निवडणूक कॅम्पेन दरम्यान हा व्हिडीओ शुट शूट केला होता.