रविवारी मुंबईमध्ये एका ५२ वर्षीय हेड कॉन्स्टेबल कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर शहराने दोन दिवसात पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे दुसरा मृत्यू बघितला. शनिवारी एका ५७ वर्षीय हेड कॉन्स्टेबल चा अशाचप्रकारे मृत्यू झाला होता.
रविवारी मृत्युमुखी पडलेल्या हेड कॉन्स्टेबल यांची नेमणूक कामोठे नवी मुंबई येथे झाली होती. त्यांच्यात लक्षणे दिसल्यानंतर २३ एप्रिल रोजी MGM हॉस्पिटलला ठेवण्यात आले होते, आणि रविवारी संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला. ते रोज कामाला जाण्यासाठी Public Transport वापरत होते त्यामुळे त्यांच्या संपर्कातील सर्व व्यक्तींचा शोध घेणे युद्धपातळीवर सुरू आहे.
नवी मुंबईचे पोलीस अधीक्षक संजय कुमार यांनी ट्विट करत सांगितले, “आमच्या नवी मुंबई पोलीस परिवारातील एक अमूल्य सदस्य आम्ही रविवारी गमावला; त्यांच्या पत्नी तसेच त्याची मुलगी यांची सुद्धा कोरोना टेस्ट पॉसिटीव्ह आली आहे. तर त्यांच्या मुलाचा रिपोर्ट अद्याप बाकी आहे. आम्ही आपल्याला संरक्षण देण्यासाठी अहोरात्र झटत आहोत, आपण सुध्दा आपली काळजी घ्या”