Home महाराष्ट्र तुम्हीच आत्महत्या करणार असाल तर त्या आरक्षणाचा उपयोग काय!

तुम्हीच आत्महत्या करणार असाल तर त्या आरक्षणाचा उपयोग काय!

0

मराठा क्रांती मोर्चाकडून गुरुवारी १ ऑक्टोबरला आवाहन करण्यात आले की, “मराठा आरक्षणाची लढाई मोठी आहे. या लढ्यात तुमचे असणे आवश्यक आहे. त्यामुळे युवकांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये” लोकमतच्या रिपोर्ट नुसार विवेक रहाडे या बीड येथील तरुण विद्यार्थ्याने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली. दरम्यान याच पार्श्वभूमीवर दादरच्या सूर्यवंशी सभागृहात श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला असताना “तुम्हीच आत्महत्या करणार असाल तर त्या आरक्षणाचा उपयोग काय” असा सवाल करून संयम बाळगून हा लढा लढूया असे आवाहन करण्यात आले.

मीडिया रिपोर्टनुसार असे कळते की, १० ऑक्टोम्बरला पुकारलेल्या बंद मध्ये मराठा क्रांती मोर्चाचा सहभाग नसणार आहे. यासंदर्भात नाशिक येथील बैठकीत स्पष्ट भूमिका घेण्यात आली आहे. त्यानुसार “ज्यांनी बंदची हाक दिली त्यांनीही बंद पुकारू नये” असे आवाहन व विनंती करण्यात आल्याचे मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी स्पष्ट केले आहे.