Home महाराष्ट्र “दिल्लीमध्ये तबलिगी कार्यक्रमाला परवानगी दिलीच कशाला; महाराष्ट्रात आम्ही ते होऊच दिले नाही!”...

“दिल्लीमध्ये तबलिगी कार्यक्रमाला परवानगी दिलीच कशाला; महाराष्ट्रात आम्ही ते होऊच दिले नाही!” : शरद पवार

0


“दिल्लीमधील निजामुद्दीन येथे तबलिगी जमातिचा जो मरकजचा कार्यक्रम झाला त्याला करोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनुमती नाकारायलाचं हवी होती पण त्यांना ही परवानगी देण्यात आली होती. ही परवानगी दिली कोणी?”, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. “अशाच कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सरकारकडेसुद्धा अनुमती मागितली गेली होती पण महाराष्ट्र सरकारने ती नाकारली, अशीच दक्षता केंद्र सरकारला घेता आली नसती काय बिघडले असते?”, असेही त्यांनी म्हटले आहेफेसबुकवर लाईव्ह येत त्यांनी हा सवाल केला. ते म्हणाले की महाराष्ट्रातसुद्धा अशाच प्रकारचे दोन कार्यक्रम होणार होते. त्यातील एक कार्यक्रम मुंबईजवळ होता आणि दुसरा सोलापुरात होणार होता.

पण मुंबई जवळच्या कार्यक्रमाला आधीच पोलिसांनी परवानगी नाकारली आणि सोलापुरातील आयोजकांवर राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्वांची पायमल्ली केली म्हणून अतिशय कडक कारवाई करण्यात आली आहे असे ते म्हणाले.

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख अशा चांगल्या प्रकारचे निर्णय घेत असतील तर अशाच प्रकारे दिल्लीतही या कार्यक्रमाला परवानगी नाकारायला हवी होती, पण तरीही त्यांना तेथे ही अनुमती दिली गेली असेल तर ती दिली कोणी याचा खुलासा व्हायलाचं हवा!” असे पवार यांनी म्हटले आहे. “या निजामुद्दीनच्या कार्यक्रमाला माध्यमांनीही गरजेपेक्षा जास्तीचं महत्व दिले आहे” ,अशी टिप्पणीही त्यांनी केली. गेल्या महिन्यात झालेल्या या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमध्ये करोनाचे चारशे रूग्ण आढळून आले असून त्यातील पंधरा जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे नऊ हजार लोकांनी या कार्यक्रमात भाग घेतला होता.


वाचा काय म्हणाले शरद पवार:

http://www.facebook.com/story.php?story_fbid=233667164684297&id=238463949663921&scmts=scwspsdd&extid=uSUlLkLy4FVQ36Zh