बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपुत याचे आत्महत्या प्रकरण आता राजकीय वळणावर आले आहे. राजकीय वर्तुळातील नेते अनेक आरोप प्रत्यारोप करत आहेत. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचेदेखील नाव आले आहे. सुशांत सिंगच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांपैकी आदित्य ठाकरे देखील एक आहेत असा आरोप करण्यात येत आहे. त्यातच भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विटद्वारे आदित्य ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. हे दोघेही सुशांत सिंगच्या आत्महत्येला जबाबदार असून त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
सुशांत सिंग राजपुतचे आत्महत्या प्रकरण सध्या वेगळीच वळणे घेत आहे. सुप्रीम कोर्टात देखील या प्रकरणाची सुनावणी झाली व आता ही केस सीबीआय कडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव आले असून संजय राऊत यांनी हा आरोप खोटा असल्याचे म्हटले आहे. अशातच निलेश राणेंचे हे ट्विट आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाले आहे.