Home खेळ स्पर्धा युवा क्रिकेटपटूचा मैदानातच सामान्य दरम्यान मृत्यू!

युवा क्रिकेटपटूचा मैदानातच सामान्य दरम्यान मृत्यू!

0

ओदिशामधील सत्यजीत प्रधान या युवा खेळाडूचा मैदानावर खेळताना अचानक मृत्यू झाला आहे. प्रधानच्या मृत्यूने सगळीकडे खळबळ उडाली आहे. लोकमतच्या एक रिपोर्ट नुसार तो केंद्रपाडा येथील देरावीश महाविद्यालयामध्ये बारावीमध्ये शिकत होता व त्याचा मृत्यू हा हार्ट अॅटॅकने झाल्याचे सांगितले जात आहे.

मैदानावर क्रिकेटचा सामना खेळत असताना प्रधानच्या अचानक चक्कर आली व जमिनीवर कोसळला. परिणामी उपस्तीत तज्ञ व डॉक्टरांनी त्याच्याकडे धाव घेतली व तपासायला सुरवात केली. मात्र तो काहीच प्रतिसाद देत नसल्याने त्याची तब्येत नाजूक असल्याचे निष्पन्न झाले आणि त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र हॉस्पिटलला पोहोचण्याआधीच या युवा क्रिकेटपटूचा मृत्यू झाला. दरम्यान त्याचा मृत्यू हार्ट अॅटॅकने झाल्याचे सांगण्यात आले.