Home राजकीय “मला भारतातील त्या जागेचं नाव सांगावं जिथे मला गोळ्या घालणार आहेत.” :...

“मला भारतातील त्या जागेचं नाव सांगावं जिथे मला गोळ्या घालणार आहेत.” : असदुद्दीन औवेसी

0

सध्या राजधानी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आम आदमी पार्टी, भाजपा व काँग्रेस या पक्षांत जोरदार लढत दिसून येत आहे. सत्तेसाठी तीनही पक्ष आपला संपूर्ण जोर लावत आहेत. दरम्यान भाजपाचे उमेदवार मनीष चौधरी यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत बोलतांना केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. ते म्हणाले, “देश के गद्दारों को..” यावर उपस्थित कार्यकर्त्यांनी ‘गोली मारो अशी घोषणा देत दुजोरा दिला, या सभेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित होते. अनुराग ठाकूर यांच्या या घोषणाबाजीला आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी थेट आव्हान दिलं आहे.

लोकमतच्या रिपोर्ट नुसार असदुद्दीन औवेसी यांनी मुंबईतील नागपाडा येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलतांना म्हटलं आहे की, “मी अनुराग ठाकूर यांना आव्हान देतो आहे की, त्यांनी मला भारतातील त्या जागेचं नाव सांगावं जिथे मला गोळ्या घालणार आहेत. मी तिथे येण्यास तयार आहे”. पुढे बोलतांना ते म्हणाले, “तुमच्या वक्तव्याने मी मुळीच घाबरलेलो नाही. कारण आमच्या माता आणि भगिनी देश वाचवण्यासाठी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या आहेत.”