Home राजकीय बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मोदींची व्हर्च्युअल रॅली; १० हजार सोशल मीडिया कमांडोज सज्ज

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मोदींची व्हर्च्युअल रॅली; १० हजार सोशल मीडिया कमांडोज सज्ज

0

येत्या काही दिवसांत होणार असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीची सर्व राजकीय पक्षांमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. सोशल डिस्टंसिंगचे निर्बंध लागू असल्याने प्रचारासाठी अनेक पक्ष विविध उपाययोजना करत आहेत. मीडिया न्यूजनुसार भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीमध्ये मोदींच्या ८ सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या सभा सुरळीत पार पडण्यासाठी व घराघरात पोहचण्यासाठी पक्षाचे ४ लाख स्मार्टफोन कार्यकर्ते व १० हजार सोशल मीडिया कमांडोज सज्ज झाले आहेत.

मोदींच्या या व्हर्च्युअल रॅलीला १५ ऑक्टोबर नंतर सुरुवात होणार आहे. येत्या २८ ऑक्टोबरला बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. त्यानंतर ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबरला दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडेल व १० नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल.