प्राईम नेटवर्क : कपडे काढून तपासणीच्या भीतीने छत्तीसगड, जशपूर येथील एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. परीक्षेआधी या विद्यार्थिनीने आपल्या भावा सोबत यावर चर्चा केल्याचं समजतं. कॉपी केल्याच्या आरोपावरून आपल्या शेळतील दोन मुली आणि एक मुलगा यांचे कपडे काढून तपासणी केली असल्याचं यावेळी या मुलीने सांगितलं होतं. माझ्या सोबत असा प्रकार घडल्यास मी जीवाचं बरं वाईट करून घेईन, असं या मुलीने म्हटलं होतं. या नंतर ४ मार्च दरम्यान या दहावीतील मुलीचा मृतदेह आढळला.
काही दिवसां पूर्वीच येथील परीक्षा केंद्रावर पहिल्या दिवशी दहावीच्या मुलांची कपडे काढून तपासणी करण्यात आली होती. परीक्षा स्कॉडला या तिघांवर संशय आल्याने या तिघांचे कपडे काढून तपासणी झाली होती. यामुळे या मुळीच सुद्धा मानसिक खच्ची करण झाल्याचं समजतं. या मुलीच्या मनात या प्रकारा बद्दल भीती बसली. यांनतर घरच्यांनी तिला अभ्यासावर लक्ष दे असं, बजावलं होतं. या सर्व प्रकारा नंतर हि मुलगी २ दिवस शांत होती, आणि अचानक घरातून गायब झाल्याने घरच्यांनी शोध घेतला असता, तिचा जवळच्या जंगलात मृतदेह आढळला.