Home राष्ट्रीय केरळमध्ये अशक्य झाले शक्य! कोरोना काळात घेतल्या १३ लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा

केरळमध्ये अशक्य झाले शक्य! कोरोना काळात घेतल्या १३ लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा

0

भारतात कोरोना विषाणूची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. पण केरळ राज्य तुलनेने कोरोनावर नियंत्रण ठेवत असल्याचे दिसत आहे. केरळच्या अर्थमंत्र्यांनी सोमवारी सांगितले आहे की, १४ दिवसांपूर्वी राज्यातील १३ लाख शालेय विद्यार्थ्यांनी अंतिम परीक्षा दिली होती, परंतु कोणताही विद्यार्थी कोरोनाने प्रभावित झाला नाही.

भारतातील बर्‍याच राज्यांत शाळा – महाविद्यालये बंद आहेत आणि परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पण केरळ सरकारने विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यांना या निर्णयाचा चांगला परिणाम दिसत आहे.

परीक्षाच्या हंगामाला सुरूवात होण्याच्या काळातच करोनानं भारतात पाऊल ठेवलं. त्यानंतर इतर उद्योग आणि सेवांबरोबर शैक्षणिक वेळापत्रकही कोलमडले. अनेक राज्यांनी शालेय विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढच्या वर्गात बढती देण्याचा निर्णय घेतला.

करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना संसर्ग होणार नाही, यादृष्टीने राज्यांनी निर्णय घेतले. दुसरीकडे करोनावर यशस्वी मात करणाऱ्या केरळनं जनजीवन पूर्वपदावर आणण्याबरोबरच शालेय विद्यार्थ्यांच्याही परीक्षा घेतल्या.

केरळचे अर्थमंत्री थॉमस इसाक यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. “१४ दिवसांपूर्वी केरळमध्ये १३ लाख विद्यार्थ्यांनी वार्षिक परीक्षा दिली. यात एका विद्यार्थ्याला करोनाची लागण झाली नाही. परीक्षेचे अत्यंत सावधपणे नियोजन करण्यात आले होते. शाळा सॅनिटाईज करण्यात आल्या. सगळ्यांना मास्क पुरवण्यात आले. थर्मल चाचणी सक्तीची करण्यात आली. तसेच फिजिकल डिस्टन्सिंगच काटेकोरपणे पाळण्यात आलं आणि मोहीम यशस्वी झाली,” असं अर्थमंत्री थॉमस यांनी ट्विट करून म्हटलं आहे.