अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होणार असून त्यासाठी अयोध्येत मोठ्या प्रमाणात तयारी चालू आहे. राम मंदिराचे भूमिपूजन नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. पूजेसाठी काशीतील विद्वान पंडित बोलवण्यात आले आहेत.
तसेच, पूजेसाठी तेथे १ लाख ११ हजार लड्डू अयोध्येत बनविण्यात येत आहेत. हे लड्डू प्रसाद म्हणून संपूर्ण जगात वाटल्या जाणार आहे.तसेच तिथे शरयू आरतीसाठी अनेक भाविक गर्दी करत आहेत.
हे सगळं चालू असतांना तिथे कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. तसेच , दहशतवाद्यांपासून सुरक्षेसाठी दुसऱ्या देशाच्या सीमेलगत असणाऱ्या जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ते लड्डू दूतावासांमार्फत संपुर्ण जगात तसेच मंदिरांमध्ये आणि तिथल्या भक्तांमध्ये वाटण्यात येणार आहे. तब्बल 500 वर्षांनी अयोध्येत एवढा आनंद दिसत आहे त्यामुळे तेथील वातावरण हे चक्क दिवाळी सारखे असणार आहे.