Home राष्ट्रीय भारत-चीन संबंध पेटले, भारताचे 20 जवान शहीद तर चिनी सैनिकांना सुद्धा धाडले...

भारत-चीन संबंध पेटले, भारताचे 20 जवान शहीद तर चिनी सैनिकांना सुद्धा धाडले यमसदनी

0

भारत-चीन संबंधांमध्ये बऱ्यापैकी कटुता आली असून चिनी ड्रॅगन गेल्या काही दिवसांपासून फुत्कार मारत आहे. काल लडाख मधील गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीमध्ये भारताचे कमीत कमी २० जवान शाहिद झाले असून, चीनचे ४० च्या वर सैनिक गंभीर जखमी आणि मारल्या गेले असल्याचे वृत्त ANI या वृत्त संस्थेने दिले आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले आहे की काल रात्री झालेला भीषण प्रकार टाळता आला असता, या आधी चीनच्या लष्कर अधिकारी आणि भारताच्या लष्कर अधिकाऱ्यांनी 2 दिवस अगोदरच चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले तरीसुद्धा चीन आक्रमक पवित्रा घेत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितलं की, ‘आम्हाला आशा आहे की सर्व काही व्यवस्थित होईल. चीनी सैन्य गलवान खोऱ्यातून मागे सरले आहे. चीनच्या एकतर्फी प्रयत्नांमुळे 15 जून रोजी हा हिंसक संघर्ष झाला. यात दोन्ही बाजूंचे लोक मरण पावले आहेत. हे टाळता आले असते.’ ते पुढे म्हणाले की, ‘सीमा भागाबाबत भारताचा नेहमीच जबाबदार दृष्टिकोन राहिला आहे. भारत सर्व काम एलएसीच्या (प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या) आपल्या हद्दीत राहून करतो. चीनकडूनही आम्हाला हीच अपेक्षा आहे’, असे ते म्हणाले आहेत.