संपूर्ण जग कोरोना व्हायरसशी झुंज देत असताना, पाकिस्तानात मात्र ३०० दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत आहेत. रमजानच्या पवित्र महिन्यातच हे दहशतवादी भारतात रक्ताचा खेळ खेळण्याचा कट आखत आहेत. यासंदर्भात गुप्तचर संस्थेकडून मिळालेल्या माहितीनंतर, भारतीय लष्कराने सीमेवरील जवानांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीओकेमधील दहशतवादी तळांवर असलेल्या अनेक दहशतवाद्यांना कोरोनाची लागण झालेली असू शकते. कारण पीओके चा हिस्सा पाकिस्तान ने कोरोना झालेल्या रुग्णांना डांबून ठेवण्यासाठी वापर करने सुरू केले आहे, यासंदर्भातही भारतीय लष्कर सतर्क आहे.
पाकिस्तानातून लश्कर-ए-तैय्यबा आणि जैश-ए-मोहम्मदचे जवळपास ३०० दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी सैन्याने आयएसआयच्या मदतीने नौशेरा आणि छम्बच्या काही भागांत एलओसीजवळ १६ दहशतवादी तळ सुरू केले आहेत. हे दहशतवादी उत्तरी काश्मीरच्या गुलमर्ग येथून भारतात घुसण्याच्या तयारीत असल्याची माहिती, लष्कराच्या फील्ड इंटेलिजंन्स युनिटला मिळाली आहे.
अधिकाऱ्यांकडून निर्देश देण्यात आले आहेत, की सीमेवर दहशतवादी अथवा घुसखोरांशी सामना झाल्यानंतर, त्यांच्या मृतदेहाजवळ जाण्यापूर्वी सुद्धा अत्यंत सतर्कता बाळगा. त्यांच्यातील अधिकांश दहशतवाद्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता आहे.