Home तंत्रज्ञान टिकटॉक सह ५९ चिनी मोबाईल अँप्स वर शासनाची बंदी,मोबाईल मध्ये असल्यास त्वरित...

टिकटॉक सह ५९ चिनी मोबाईल अँप्स वर शासनाची बंदी,मोबाईल मध्ये असल्यास त्वरित काढून टाका

0

चीन सोबत सीमाभागात सुरू असलेला तणाव काही केल्या कमी होत नसल्याची चिन्हे असताना भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे, टिक टॉक सह ५९ चिनी मोबाईल अप्लिकेशन वर बंदी घालण्यात आली आहे. या अप्लिकेशन चा वापर करणे हे बेकायदेशीर असणार असून त्यांच्या वापर करणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते असा इशारा सरकारने दिला आहे.

भारत सरकारने प्रसारमाध्यमांसाठी प्रसिद्धी पत्रक जाहीर केले आहे, ” माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालय हे माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६९ अ नुसार आणि २००९ च्या कायद्यानुसार सुरक्षतेला असलेल्या धोक्यांमुळे ५९ चिनी मोबाईल अँप्स वर बंदी घालत आहोत, या अँप्स मुळे भारताच्या अंतर्गत सुरक्षेला धोका असून ह्या अँप्स मूळे भारतातील संवेदनशील माहिती चोरीला जात आहे”.

माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानुसार या चिनी कंपन्या भारतातील लोकांच्या डेटा ची चोरी करत होत्या अशी तक्रार अनेक दिवसांपासून नागरिकांकडून केली जात होती त्यानुसार CERT या संस्थेने संशोधन करून निष्कर्ष काढला आहे.

भारतातील तरुणांमध्ये प्रचंड प्रसिद्ध असलेले अँप Tik Tok याचे भारतात सर्वात जास्त वापरकर्ते असून त्या खालोखाल चीन आणि अमेरिकेत आहेत.

बंदी घातलेल्या ५९ अँप्स ची यादी खालीलप्रमाणे