देशातील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येतील वाढत असलेला कल हा कायम असून गेल्या चोवीस तासामध्ये ७८० कोरोनाग्रस्त वाढलेले आहेत आणि देशातील एकूण रुग्णसंख्या ५२०० च्या घरात पोहोचली. लॉकडाउनला सोळा दिवस उलटल्यानंतरसुद्धा देशभरात ५० जणांचा मृत्यू झाला असून ४०१ लोक बरेही झाले आहेत.
गेल्या चोवीस तासांमध्ये देशातील रुग्ण संख्येत झालेल्या वाढीमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक ६७ रुग्ण आढळले असून बळींची संख्याही वाढली आहे. गुजरात, मध्यप्रदेशातसुदधा संसर्ग वाढला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगटाने हा लॉकडाउन जरी वाढवला नाही तरी शैक्षणिक संस्था, मॉल आणि धार्मिक संस्थांवरील बंदीची मुदत किमान १५ मे पर्यंत वाढवावी अशी आग्रही शिफारस नक्की केली आहे.
तर मुंबईमध्ये कोरोनाचे केंद्र असल्यामुळे अत्यावश्यक सेवेसाठी जर बाहेर पडावं लागतच असेल किंवा कोणत्याही कारणासाठी बाहेर पडायचं असेल तर मास्क वापरणं अत्यंत सक्तीचं आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. सोशल डिस्टन्सिंग सगळ्यांनी काटेकोरपणे पाळावं असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. अगदी कॉटनचा मास्क वापरलात तरीही चालेल मात्र वापरणं सक्तीचं आहे असंही ते म्हणाले.