Home आरोग्य चिंताजनक बातमी: देशातल्या ८०% पॉसिटीव्ह रुग्णांना कोरोणाची लक्षणेच नाहीत

चिंताजनक बातमी: देशातल्या ८०% पॉसिटीव्ह रुग्णांना कोरोणाची लक्षणेच नाहीत

0

देशातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढता आहे. गेल्या 24 तासाभरात देशात १५६० नवीन रुग्ण आढळले असून ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

देशातील एकूण रुग्णांचा आकडा १७,२६२ झाला आहे. रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना जवळपास ८० टक्के रूग्णांमध्ये कोरोनाची लक्षणच दिसत नाहीत, अशी चिंताजनक माहिती आयसीएमआरने दिली आहे.

आयसीएमआरचे वरिष्ठ संशोधन डॉक्टर आर. गंगाखेडकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, कोरोना सामना करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. परंतु पॉझिटिव्ह आढळलेल्या ८०% रूग्णांमध्ये कोरोनाची लक्षणच दिसून आलेलं नाहीत, ही बाब चिंताजनक आहे असे ते म्हणाले. त्यामुळे कोरोना बाधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करणे प्रचंड कठीण जात आहे. अशा प्रकरणाचा तपास लावण्याचा एकच पर्याय आहे तो म्हणजे ज्या रुग्णाला कोरोना झाला आहे त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची कोरोना चाचणी करणे, त्याशिवाय अशा रुग्णांचा शोध घेणे कठीण आहे. तसेच अशा पद्धतीने शोध घेतला नाही तर परिस्थिती अतिशय अवघड होईल, असेही डॉक्टर आर. गंगाखेडकर यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, सर्दी, खोकला आणि तीव्र ताप असणाऱ्या लोकांना कोरोना संक्रमित मानून त्यांना आयसोलेट करण्यात येत आहे. मात्र दिल्लीमध्ये गेल्या २४ तासात कोरोना बाधितांची जी आकडेवारी आली आहे त्यातील रुग्णांना सर्दी, खोकला आणि ताप या सारखी कुठलेच लक्षण दिसलेली नाहीत. त्यामुळे अशा रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता आहे. दिल्लीत आढळून आलेल्या जवळपास २५ टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षण दिसली नाही आणि हे चिंताजनक आहे, असेही डॉक्टर आर. गंगाखेडकर यांनी सांगितले. त्यामुळे अशा लोकांना आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे कळत नाही आणि ते बिनबोभाट बाहेर फिरतात. यामुळे इतरांनाही याची लागण होण्याचा धोका वाढत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही यावर त्यांची चिंता व्यक्त केली आहे.