Home राष्ट्रीय केवळ ५० रुपयांसाठी बस चालकाने स्फोटकांनी भरलेली बॅग जम्मूत पोहचवली, सुदैवाने मोठा...

केवळ ५० रुपयांसाठी बस चालकाने स्फोटकांनी भरलेली बॅग जम्मूत पोहचवली, सुदैवाने मोठा धोका टळला…

0

जम्मू काश्मीरमध्ये कायम अतिरेकी हल्ले, बॉम्बस्फोट होतात हे आपण बातम्यांमध्ये ऐकत असतो. असाच एक मोठा हल्ला होता होता टळला आहे. जम्मूमध्ये एका बसमधून १५ किलो स्फोटके पोहचवण्यात आली. एखादे छोटे शहर पूर्णपणे उध्वस्त झाले असते एवढी ही स्फोटके होती. परंतु जवानांनी वेळीच ही गोष्ट समोर आणून दहशतवाद्यांचा कट उधळून लावला आहे.

कठुआ जिल्ह्यातील बिलावर येथे एका दाम्पत्याने एका खासगी बसचालकला एक बॅग जम्मूमध्ये पोहचवण्यासाठी दिली. याचे त्यांनी त्याला ५० रुपये दिले व बाडी ब्राह्मण येथे मुले येऊन ती बॅग घेऊन जातील असे सांगितले. तिथे पोहचल्यावर बरेच प्रवासी उतरले व दहा मिनिटे होऊन गेली तरी कोणी बॅग घ्यायला आले नाही. सुदैवाने टीए बटालियनचे काही जवान याच बसमधून प्रवास करत होते. दाम्पत्याने बॅग दिली तेव्हापासून हे जवान बॅगवर लक्ष ठेवून होते. मात्र ती न्यायला कोणीही आले नाही म्हणून जवानांनी पोलिसांना फोन करून बोलावून घेतले. पोलिसांनी बॅगची तपासणी केली असता त्यात जवळपास १५ किलो स्फोटके सापडली. नंतर ही बॅग ताब्यात घेण्यात आली आणि चालकाला चौकशीसाठी नेण्यात आले. जवानांच्या सतर्कतेमुळे जम्मूवरील एक मोठा धोका टळला असे मीडिया न्यूजमध्ये सांगण्यात येत आहे.