प्राईम नेटवर्क : गुजरात मध्ये मागील आठवड्यात, मेडिकलच्या विध्यर्थीनींना मासिक पाळी आहे किंवा नाही हे सिद्ध करण्यासाठी तब्बल ६८ विद्यार्थिनींना त्यांची अंतर्वस्त्रे काढण्यासाठी कॉलेज प्रशासनाने दबाव टाकला होता, आणि या विध्यर्थीनींची चाचणी घेण्यात आली होती, हे प्रकरण ताजं असतानाच पुन्हा एकदा गुजरात मध्येच सुरत येथे तब्ब्ल १०० महिलांना विवस्त्र करत त्यांची चाचणी घेण्यात आली. यातील काही अविवाहित महिलांना आपत्तीजनक प्रश्न सुद्धा विचारण्यात आले होते. या बद्दलचं सविस्तर वृत्त टाइम्स ऑफ इंडिया या वृत्त पत्राने दिले आहे.
हि सर्व घटना सुरत महानगरपालिकेच्या एका रुग्णालयात घडली, रुग्णालयाच्या एका कर्मचारी संघटनेने एका अधिकार्या समोर या बद्दल तक्रार केली. तक्रारीत त्यांनी म्हटलं, जवळपास १०० महिला प्रशिक्षणार्थींनीना फिटनेस टेस्ट घेण्यासाठी दहा – दहा च्या गटाने विवस्त्र उभे करण्यात आले होते.
यावेळी एका अधिकाऱ्याने घडलेला प्रकार सांगितला, या प्रशिक्षणार्थींनीना ज्या खोलीत विवस्त्र केलं होतं, त्या खोलीचा दरवाजा हि व्यवस्थित नव्हता, या सोबत त्यांना नको ते खासगी प्रश्न विचारण्यात आले. तुम्ही या आधी कधी गर्भवती राहिला होता का ? असे आपत्तीजनक प्रश्न विचारण्यात आले होते.
याबद्दल या संस्थेतील स्त्री रोग विभागाचे अधिकारी अश्विन वछानी यांनी सांगितलं, कि रुग्णालयाच्या नियमानुसार आरोग्य चाचणी करणे अनिवार्य आहे, अशी महिलांची नियमित चाचणी होते, मात्र पुरुषांच्या आरोग्य चाचणी बद्दल अधिक माहिती नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान गुजरात मध्ये मागील आठवड्यात, मेडिकलच्या विध्यर्थीनींना मासिक पाळी आहे किंवा नाही हे सिद्ध करण्यासाठी तब्बल ६८ विद्यार्थिनींना त्यांची अंतर्वस्त्रे काढण्यासाठी कॉलेज प्रशासनाने दबाव टाकला होता, आणि या विध्यर्थीनींची चाचणी घेण्यात आली होती.