Home राष्ट्रीय अभिनेत्री ने केला खुलासा! ‘त्या पार्टीत मंत्री आदित्य ठाकरे ही होते उपस्थित’.

अभिनेत्री ने केला खुलासा! ‘त्या पार्टीत मंत्री आदित्य ठाकरे ही होते उपस्थित’.

0

रिया चक्रवर्ती ला अटक झाल्यांनंतर अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण अधिकच चिघळले आहे. त्यातच नवीन गोष्टींचा खुलासा होत आहे.

एका अभिनेत्री ने खुलासा केलाय की सुशांतची मॅनेजर दिशा सालियनने आयोजित केलेल्या एका पार्टीत शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित असल्याचं म्हटलं आहे. हे सगळं ती एका वृत्तवाहिनी कडून घेण्यात येणाऱ्या मुलाखतीत बोलत होती.

सुशांत च्या आधीच त्याची मॅनेजर दिशा सालियनचा मृत्यु झाला होता. त्यानंतर एका आठवड्यातच सुशांतनचाही मृत्यु झाला होता. दिशा च्या मृत्यू चे कारण अद्यापही समजले नाहीये परंतु आता सीबीआय आता सुशांत च्या प्रकरणाचा शोध घेत आहे आणि त्यामध्ये अनेक पुरावे हाती लागत आहेत.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी या आधीच स्पष्ट केलं आहे, की सुशांतच्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. परंतु भाजप नेते नारायण राणे बोलले की माझ्याकडे काही पुरावे असून ते थोड्याच दिवसात समोर आणणार असून युवा मंत्री यामध्ये सामील असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.