सैन्यदलाकडून अर्थात सशस्त्र सीमा दलाकडून अनेक पदांसाठी जागा निघाल्या असून अर्ज मागविण्यात आले आहेत. सैन्यात तसेच पोलीस दलात भरती होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. राज्य सरकारने येत्या डिसेंबरपर्यंत १२,००० जागांसाठी पोलीस भरती होणार असल्याचे सांगितले आहे. तसेच सशस्त्र सीमा दलात देखील १५२२ जागांसाठी भरती होणार आहे. यातून निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा रुपये २१,७०० ते ६९,१०० इतके वेतन मिळू शकेल.
वय वर्षे १८ ते २७ या वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. उमेदवारांची लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी व मुलाखत घेऊन निवड करण्यात येणार आहे.ही अर्जप्रक्रिया २७ ऑगस्टपासून सुरू झाली असून येत्या २७ सप्टेंबरपर्यंत www.ssb.nic.in या संकेतस्थळावरून अर्ज भरणे अनिवार्य आहे. हा अर्ज करण्यासाठी सामान्य, ओबीसी, ईडब्ल्यूएस या गटांसाठी १०० रुपये फी आकारण्यात आली असून तर एससी, एसटी व महिला गटांना निशुल्क अर्ज भरता येणार आहे.