Home राष्ट्रीय हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी ठार : नक्की काय घडलं ?

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी ठार : नक्की काय घडलं ?

0

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही नराधम आरोपी ठार झाले आहेत. महिला पशुवैद्यकावर सामूहिक बलात्कार करून  हत्या व नंतर मृतदेह जाळून आरोपात चार जणांना अटक करण्यात होते. मीडिया रिपोर्ट नुसार हे चारही आरोपी पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार झाले आहेत. तपासणी दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे समोर येत होते त्यामुळे पोलोसांची अधिक तपासासाठी चारही आरोपींना घटनास्थळी नेले असताना अचानक त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आले पण ते थांबायला तयार नसल्याने शेवटी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला आणि त्यात चारही आरोपींचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार राष्ट्रीय महामार्ग ४४ वर त्यांना नेण्यात आलं होतं. त्यावेळी या चारही आरोपींनी पोलिसांवर हल्ला केला व  पळून जाण्याचा प्रयत्न केला शेवटी पोलिसांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.