Home राष्ट्रीय आजपासून गल्लीबोळातील सर्व दुकाने उघडणार, फक्त मॉल्स बंद

आजपासून गल्लीबोळातील सर्व दुकाने उघडणार, फक्त मॉल्स बंद

0

केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविलेला आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सेवाच सुरु राहणार होत्या. मात्र, आजपासून सर्वच दुकाने काही अटींवर उघडता येणार आहेत. गृह मंत्रालयाने तसा आदेश काढलेला असून नागरिकांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. य़ा दुकानांमध्ये केवळ ५० टक्केच कामगार काम करू शकणार आहेत.

केंद्र सरकारने २० एप्रिलपासून काही कंपन्यांना कमी कर्मचाऱ्यांवर काम करण्याची संमती दिली होती. तसेच दुरुस्ती करणाऱ्या लोकांनाही काम करण्याची परवानगी मिळाली होती. आता अन्य दुकानांना परवानगी काही सशर्थ अटींवर मिळाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.या आदेशामध्ये शॉपिंग मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्सना परवानगी देण्यात आलेली नाही.

देशात उद्यापासून काही व्यापारी व्यवहार होण्यास सुरुवात होऊ शकते. निवासी कॉलनीच्या जवळील दुकाने आणि स्टँड अलोन दुकाने आजपासून उघडण्याची पूर्ण परवानगी देण्यात आली आहे. यासाठी ही दुकाने नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रामध्येचं असली पाहिजेत. याशिवाय गृह मंत्रालयलाने काही अटीही लागू केल्या आहेत.या अटींनुसार सर्व दुकाने संबंधित राज्य, केंद्र शासित प्रदेशांना प्रदेशांच्या स्थापना कायद्यानुसार नोंदणीकृत असायला हवीत. तसेच या दुकानांमध्ये निम्मे कामगार काम करू शकणार आहेत. त्यांनी मास्क लावणे आणि सोशल डिस्टंन्सिंग पाळण्याचे आदेशात म्हटले आहे.

हॉटस्पॉट आणि कंटेनमेंट झोन वगळले, कोरोनामुळे प्रभावित असलेले भाग या सूटमधून वगळण्यात आले आहेत. हॉटस्पॉट आणि कंटेनमेंट झोन मधील दुकाने ही बंदच राहणार आहेत. तसेच शहरी सीमेच्या बाहेर येणाऱ्या दुकानांनाच परवानगी आहे. तसेच बाजार, कपड्यांची दालने जिथे ग्राहक स्वत: फिरतात ती किंवा तशा प्रकारची इतर दुकाने बंद राहणार आहेत.

Ministry Of Affairs चा संपूर्ण निर्णय वाचण्यासाठी खालील लिंक वर जा

https://www.mha.gov.in/sites/default/files/MHA%20order%20dt%2015.04.2020%2C%20with%20Revised%20Consolidated%20Guidelines_compressed%20%283%29.pdf