लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांच्यानुसार भारतीय सैन्य आता कुठल्याही आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज आहे असा अप्रत्यक्ष इशारा त्यांनी चीन ला केला. ते बोलले की, लष्कर म्हणून च नाही तर देशाला आमचा अभिमान वाटेल अशी कामगिरी आम्ही करू.
चीनच्या कुरापती करणे थांबले नसून त्याचे प्रमाण वाढतच आहे. पूर्व लडाखच्या प्रत्यक्ष ताबा रेषेवर चीनच्या कुरापती सुरूच आहेत.चीनने पॅगॉग लेकच्या दक्षिण किनाऱयावर घुसखोरी केली आहे अशी माहिती लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी
दोन दिवसांचा लेह-लडाख दौरा केला यामधून कळली आहे.
लष्करप्रमुखांनी खालीलप्रमाणे माहिती दिली आहे त्यात ते बोलले की,
गुरुवारी लेहमध्ये आल्यानंतर मी परिसराला भेटी दिल्या. अधिकाऱयांकडून परिस्थितीचा आढावा घेतला. जवानांशीही बोललो आहे.
जवानांचे मनोबल उंचावलेले आहे. कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी जवान सज्ज आहेत.
हिंदुस्थानचे लष्कर हे एक जगातले सर्कोत्तम लष्कर आहे.फक्त लष्करच नाही तर देशाला अभिमान वाटेल अशी आम्ही कामगिरी करू.
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सीमेवर थोडी तणावाची स्थिती आहे.देशाची सुरक्षा आणि अखंडतेचे रक्षण होईल यादृष्टीने जवानांची तैनाती केली जात आहे.