Home राष्ट्रीय अर्णब गोस्वामींचा जामीन मंजूर; न्यायालयीन कोठडीतून सुटका

अर्णब गोस्वामींचा जामीन मंजूर; न्यायालयीन कोठडीतून सुटका

0

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वानी यांना अखेर जमीन मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाल्यामुळे अर्णब गोस्वामींना न्यायालयीन कोठडीतून सुटका मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अर्णब गोस्वामींसह नितेश व फिरोज अशा या तिघांना अन्वय नाईक आत्महत्येस जबाबदार असल्याप्रकरणी ताब्यात घेतले होते व कोर्टाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. गेले आठ दिवस या तिघांना अलिबाग येथील नगरपरिषद शाळेत कैद्यासाठी असलेल्या कोविड सेंटर जेलमध्ये ठेवले होते.

या तिघांनाही तात्पुरता जामीन मिळाला असून ५० हजारांच्या बॉन्डवर सुप्रीम कोर्टाकडून हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान अर्णब गोस्वामी अटकेत असतांना बरेच राजकारण झाले. विरोधी पक्षनेत्यांनी अर्णब गोस्वामींच्या अटकेचे खापर राज्य सरकारच्या डोक्यावर फोडले तर राज्य सरकारच्या नेत्यांनी विरोधी पक्षावर आरोपीची बाजू घेत असल्याचा आरोप केला. हा वाद आता थंडावला असून सुप्रीम कोर्टाने पोलिसांना तिन्ही आरोपींना अटकेतून सोडण्याचा आदेश दिला आहे.