Home राष्ट्रीय अयोध्या निकाल: पहा काय दिले सर्वोच्च न्यायालयाने आदेश…

अयोध्या निकाल: पहा काय दिले सर्वोच्च न्यायालयाने आदेश…

0

अयोध्येतील जमीन मालकी हक्काच्या वादातून चालू असलेला खटला नुकताच निकाली लागला आहे. राम जन्मभूमी-बाबरी मशीद हा वाद तब्बल १०६ वर्षे जुना आहे.

९ नोव्हेंबर २०१९ रोजी म्हणजेच आज सकाळी १०.३० वाजता सर्वोच्च न्यालायने निकाल जाहीर केला की अयोध्येतील वादग्रस्त जागा हिंदूंचीच असून ती त्यांना देण्यात यावी. तसेच मशिद बांधण्यासाठी मुस्लिम पक्षकारांना अयोध्येतच पाच एकर पर्यायी जागा द्यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. हा निर्णय जनतेने मान्य केला असुन सगळीकडे या निर्णयाचं स्वागत करण्यात येत आहे. हा निकालाचा दिवस एक ऐतिहासिक दिवस म्हणून कायम आठवणीत राहणार आहे कारण १०६ वर्षांपासून चालत आलेला हा वाद आज निकाली लागला आहे.