Home राष्ट्रीय बाबरी मस्जिद, राम जन्मभूमी की बौद्ध स्तूप ‘साकेत’! ती वादग्रस्त जागा पुन्हा...

बाबरी मस्जिद, राम जन्मभूमी की बौद्ध स्तूप ‘साकेत’! ती वादग्रस्त जागा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

0

आज सोशल मीडिया ट्विटर वर दोन हॅश टॅग नी भारतीय ट्विटर युजर्सचे लक्ष वेधून घेतले. हे दोन हॅश टॅग म्हणजे #बौद्धस्थलअयोध्या आणि #बौद्धस्थलजामामस्जिद
हे दोन हॅशटॅग वापरणाऱ्यांच्या मते अयोध्या येथे कथित इमारतीच्या खोदकामातील अवशेषांवरून इथे अगोदर सम्राट अशोकाने बांधलेले बौद्ध स्तूप होते.

अयोध्येतील या वास्तूच्या मालकीचा खटला हा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होता मात्र २०१९ मध्ये न्यायालयाने हा खटला निकाली लावला त्यानुसार ही जागा तीन भागांमध्ये विभागून रामलल्ला, निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्ड यांच्यामध्ये विभागून देण्यात येईल. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या खटल्यात ज्या १४ लोकांनी अपील केली होती त्यापैकी १ म्हणजेच विनीत कुमार मौर्य यांनी ही जागा प्राचीन बुद्ध विहार असल्याचे अपील केले होते.

हा खटला सर्वोच्च न्यायालयात येण्या आधी अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित होता, अलाहाबाद न्यायालयाने या खटल्यासाठी पुरातत्व विभागाचे पुरावे सादर केले होते. भारतीय पुरातत्व खात्याने दिलेल्या पुराव्यानुसार त्या जागेवर मस्जिद अस्तित्वात असण्या अगोदर बौद्ध स्तूप, त्याचे घुमट आणि खांब असल्याचे सिद्ध होते. तसेच अनेक इतिहासकारांच्या मते अयोध्या ही जागा म्हणजे सम्राट अशोकाच्या काळातील ‘साकेत’ हे आहे.

मौर्य यांनी केलेल्या अपील मधील खटल्यात पुरातत्व विभागाचा १८६०-६२ मधील पुरावा देण्यात आला होता, यामध्ये ब्रिटिश पुरातत्व खात्याचे अधिकारी अलेक्झांडर कॅनिंगहोम यांनी केलेल्या उत्खननाचा तपशील देण्यात आला. अलेक्झांडर यांच्या मते उत्खनन करताना या जागेवर कुठेही हिंदू मंदिराचे अवशेष सापडले नव्हते तर ती वास्तू एक पडझड झालेली एक बौद्ध स्तूप आहे!

ट्विटर वर अचानक ट्रेंड झालेल्या या हॅशटॅग मुळे मात्र आता या वादग्रस्त प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. काहींच्या मते सदर वास्तूचे विना हस्तक्षेप उत्खनन हे UNESCO या संस्थेने करावे जेणेकरून पक्षपात न होता सत्य समोर येईल!