Home राष्ट्रीय बालाकोट मधील मेलेल्या दहशतवाद्यांचा आकडा समजला, पुरावे मागणे म्हणजे मूर्खपणा

बालाकोट मधील मेलेल्या दहशतवाद्यांचा आकडा समजला, पुरावे मागणे म्हणजे मूर्खपणा

0

प्राईम नेटवर्क : काश्मीरच्या पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या हल्ल्यात ४० पेक्षा जास्त जवान शहिद झाले होते, पुलवामाचा बदला घेण्यासाठी २७ फेब्रुवारीला रात्री ३ च्या सुमारास पाकिस्तानच्या बालाकोटच्या दहशतवादी प्रशिक्षण देणाऱ्या तळांवर हवाई हल्ला केला होता. पाकिस्तानच्या बालाकोट येथे भारतीय वायू सेनेने केलेल्या हवाई हल्ल्यात किती दहशतवादी मारले याचे ठोस आकडे मिळू शकले नाहीत, अशातच देशातील विरोधक सुद्धा पाकिस्तानची बाजू घेत, पाकिस्तान प्रमाणे भारतीय वायू दलाकडे पुरावे मागत आहेत. वायु दलाने स्पष्ट केलं कि, आम्ही फक्त आमचं लक्ष अचूक टिपतो, दहशतवाद्यांचे मृतदेह मोजायच काम आमचं नाही. अशातच NTRO या इंटेलिजियंस एजन्सीने पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवादी तळांवर तब्बल ३०० मोबाईल ऍक्टिव्हेट होते, असा दावा केला आहे. गुप्तचर संस्थेने माहिती दिल्याचं वृत्त एनआय या वृत्त संस्थेने दिलं आहे.

जैशच्या तळांवर हल्ले झाल्याचं अझरच्या भावाने केलं कबूल

जैशच्या तळांवर हल्ले झाले आणि यात जैशचं फार मोठं नुकसान झाल्याचं मसूद अझरच्या भावाने कबूल केलंय, या संबंधी मसूदचा भाऊ भाषण देत असताना त्याचा ऑडिओ व्हायरल झाला आहे.

म्हणून सध्या भारतीय सेनेकडे हल्ल्याचे पुरावे मागणे मूर्ख पणा

पाकिस्तान वरील दहशतवाद विरोधी कारवाई सध्या भारतीय सेनेकडून केली जात आहे, यामुळे भविष्यात काही दिवसात पुन्हा पाकिस्तानी सीमे पलीकडे घुसून भारतीय सेनेला कारवाई करायला लागू शकते, अशावेळी पाकिस्तान विरुद्धच्या कारवाईचे पुरावे भारतीय सेनेने इतक्या लवकर पुरावे दिल्यास, पुढील कारवाईच्या दृष्टीने मूर्खपणाचं ठरेल. कारण अजून पर्यंत पाकिस्तानला भारताने कारवाई कशी केली आहे, याचा सुगावा अजूनही पाकिस्तानला लागला नाही. राहुल गांधी, काँग्रेस यांच्या इतर विरोधक, हा मुद्दा लक्षात येऊन सुद्धा देशाच्या सुरक्षिततेचा विचार न करता पुढील निवडणुकीच्या दृष्टीने राजकारण करत आहेत.