Home राजकीय जागावाटपाचा प्रश्न लागला मार्गी, विधानसभेत भाजप-शिवसेना युती निश्चित…

जागावाटपाचा प्रश्न लागला मार्गी, विधानसभेत भाजप-शिवसेना युती निश्चित…

0

येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना पुन्हा एकदा युतीने लढणार असून कालपर्यंत टांगणीला असलेला जागावाटपाचा प्रश्न लवकरच सुटणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. भाजपने दिलेल्या १६०-१२० च्या फॉर्म्युलावर शिवसेनेने नापसंती दर्शवल्याने दोन्ही पक्षांनी मिळून यावर तोडगा काढला आहे.

जागावाटप करण्यासाठी भाजप शिवसेनेने नवीन फॉर्म्युला निश्चित केला आहे. या फॉर्म्युलानुसार दोन्ही पक्षांत झालेलं इनकमिंग आणि मागील दोन निवडणुकांमधील मतं या दोन घटकांचा विचार करून जागावाटप होईल असे ठरवण्यात आले. तसेच एकूण २८८ जागांपैकी १२६ जागा शिवसेनेला देऊन उरलेल्या १६२ जागा भाजप व लहान मित्रपक्षांसाठी ठेवाव्यात असेही या नवीन फॉर्म्युल्यात नमूद केले आहे. या १६२ जागांपैकी रिपाई, रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती संघटना अशा लहान मित्रपक्षांना भाजपने ८ पेक्षा जास्त जागा द्याव्यात व उर्वरित जागा स्वतः लढाव्यात असाही प्रस्ताव मांडला गेला. त्यामुळे लहान मित्रपक्षांचे समाधान करण्याची जबाबदारी भाजपवर आली आहे. हा फॉर्म्युला दोन्ही पक्षांकडून मान्य होणार असल्याची शक्यता आहे.