Home राजकीय बिहार विधानसभा निवडणूक: शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मते

बिहार विधानसभा निवडणूक: शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मते

0

बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत झालेल्या मोजणीत भाजप-जेडीयू आघाडीवर आहे. शिवसेनेचे नेते २३ जागांवर निवडणूक लढवत होते. यापैकी २१ जागांवर नोटा पेक्षाही कमी मते शिवसेनेला मिळाली आहेत.

बिहार निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेना उत्साहाने सहभागी झाली होती. मात्र तेथील मतदारसंघांमध्ये शिवसेनेची नाचक्की झाली आहे. सुरुवातीच्या मतमोजणीत शिवसेना उमेदवारांना केवळ ०.०४ टक्के मते मिळाली होती. तसेच बिहार निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार बिहारमधील २३ शिवसेनेच्या जागांपैकी २१ जागांवरील उमेदवारांना नोटापेक्षाही अर्थात ‘वरीलपैकी कोणीही नाही’ यापेक्षाही कमी मते मिळाल्याचे समजले. परिणामी बऱ्याच शिवसेना उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता आहे.