Home राजकीय भाजपचे फेसबुकसह व्हाट्सएपसोबतही हातमिळवणी – राहुल गांधी

भाजपचे फेसबुकसह व्हाट्सएपसोबतही हातमिळवणी – राहुल गांधी

0

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना पत्र पाठवून भाजपशी त्यांच्या संबंधांबद्दल प्रश्न विचारले. काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी भाजपचे फेसबुकशी संबंध असल्याचा आरोप केला होता. आता फेसबुकसह भाजपने व्हाट्सऍपशी देखील हातमिळवणी केली असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या ‘द वॉल स्ट्रीट’ या जर्नलने फेसबुक व भाजपमधील संबंधांवर सवाल केला होता. हे कळल्यावर काँग्रेसने हा प्रश्न उचलून धरला व सरकारला याबद्दल प्रश्न केला. त्यानंतर आता भाजपचे व्हाट्सऍपवरही नियंत्रण असल्याचे राहुल गांधी म्हणत आहेत असे मीडिया न्यूजवरून समजले. राहुल गांधींनी याबद्दल ट्विट केले आहे.

या ट्विटमध्ये राहुल गांधी म्हणाले की, ‘अमेरिकेतील टाइम्स मॅगझीनने व्हाट्सऍप आणि भाजपमध्ये संबंध असल्याचा खुलासा केला आहे.