Home राष्ट्रीय कोरोनाला पळवून लावण्यासाठी भाजप आमदाराने चिखलात बसून वाजवला शंख!

कोरोनाला पळवून लावण्यासाठी भाजप आमदाराने चिखलात बसून वाजवला शंख!

0

कोरोनाला पळवून लावण्यासाठी अनेक लोक अनेक उपाय सांगत आहेत. त्यातच भारतीय जनता पक्षाचे मधोपूर(राजस्थान) येथील खासदार सुखबीर सिंग जौनापुरिया यांनी चिखलात बसून कोरोनाला घालवण्याचा मार्ग सांगितला.

याआधीही योगा दिनाला त्यांनी चिखलात बसून त्यांनी योगा केला होता. ते बोलले की चिखल अंगाला लावल्याने आपली प्रतिकार शक्ती वाढते. यासंबंधी व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कोरोना संकटामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले असून कोरोनावर लस शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, जौनापुरिया यांनी कोरोनाला पळवून लावण्यासाठी चिखलात बसणे हा उत्तम उपाय असल्याचे सांगितले आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जौनापुरिया हे चिखलात बसले आहेत. अंगाला चिखल लावून शंख वाजवतांना दिसत आहेत.

तसेच, काही दिवसांपूर्वी भाजपचे केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ‘भाभीजी पापड’ खाल्याने प्रतिकारक क्षमता वाढते असे सांगितले होते. त्याआधी भोपाळचे भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी दररोज हनुमान चलिसा म्हणा व कोरोना पळवा असा सल्ला दिला होता.