CAA Protest : दिल्लीतील जामिया मिलिया विद्यापीठाजवल पुन्हा गोळीबार; जीवितहानी नाही
CAA NRC विरोध देशभरात थंडावलेला दिसत असला तरी दिल्लीत घडत असलेल्या चकमकी अजूनही कमी झालेल्या नाहीत. जामिया विद्यापीठाबाहेर आंदोलनासाठी बसलेल्या विद्यार्थ्यांसमोर दोन अज्ञातांनी बाईकवरून हवेत गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे. लोकमतच्या रिपोर्टनुसार गेल्या ४ दिवसांतील ही तिसरी घटना आहे.
काल अर्थात रविवारी रात्री ही घटना घडली. जामिया कॉर्डिनेशन कमिटीने दिलेल्या माहितीनुसार जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या गेट क्रमांक ५ जवळ दोन अज्ञात व्यक्ती लाल रंगाच्या स्कुटीवरून आले व त्यांनी हवेत गोळीबार केला. गोळीबाराच्या आवाजाने आजूबाजूच्या परिसरातील लोक जामिया विद्यापीठाजवळ जमा झाले. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची दखल घेत दिल्ली पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर केली आहे व अज्ञातांचा शोध सुरू केला आहे.