Home राष्ट्रीय लॉकडाऊन गुंडाळण्याची सुरुवात झाली, लॉकडाउन ५.० मध्ये मोठी सूट!

लॉकडाऊन गुंडाळण्याची सुरुवात झाली, लॉकडाउन ५.० मध्ये मोठी सूट!

0

केंद्र सरकारने आता लॉकडाऊन उठवण्यासाठी पाऊले टाकण्यास सुरवात केली आहे. लॉकडाऊनचा पुढचा टप्पा म्हणजेच लॉकडाऊन 5 हा फक्त प्रतिबंधित क्षेत्रांपुरता मर्यादित राहणार असून इतरत्र सबंध देशात लॉकडाऊन हा टप्प्या टप्प्यात संपुष्टात आणणार आहेत.

केंद्रीय गृह मंत्रालयाने नवीन आकडेवारी जाहीर करत आज शनिवारी लॉकडाऊनच्या पुढच्या टप्प्याची घोषणा केली आहे. जून ८ पासून जर तुम्ही प्रतिबंधित क्षेत्रात नसाल तर पुढील नियम लागू होणार आहेत:

पहिला टप्पा:
धार्मिक स्थळे तसेच हॉटेल्स, रेस्टॉरंट यांना सशर्त परवानगी.

दुसरा टप्पा:
शाळा कॉलेजेस ही जुलै मध्ये सुरू करण्यासाठी राज्य सरकारशी बातचीत

तिसरा टप्पा:
मेट्रो, मॉल्स, सिनेमागृह, बार, खेळाची मैदाने, करमणूक समारंभ इत्यादी

रात्रीचा कर्फ्यू हा संध्याकाळी ७ ते सकाळी ७ ऐवजी आता रात्री ९ ते सकाळी ५ पर्यंत करण्यात आला.

प्रतिबंधित क्षेत्रात मात्र लॉकडाऊन हे जून अखेरपर्यंत सुरू राहणार असून या ठिकाणी फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. तसेच प्रतिबंधित क्षेत्र ठरवण्याची जबाबदारी ही त्या त्या जिल्ह्याच्या प्रशासनावर असेल.