Home राष्ट्रीय लॉकडाऊनची नियमावली केंद्र सरकारकडून जाहीर, वाचा काय काय सुरू होणार…

लॉकडाऊनची नियमावली केंद्र सरकारकडून जाहीर, वाचा काय काय सुरू होणार…

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल १४ एप्रिल रोजी देशवासियांना व्हिडीओ द्वारे संबोधित केलं. यावेळी त्यांनी ३ मे पर्यंत देशातला लॉकडाऊन कालावधी वाढवण्यासाठीची घोषणा केली. यावेळी १५ तारखेला लॉकडाऊनची नियमावली जाहीर होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आज ही नियमावली जाहीर झाली आहे.

लॉकडाऊनच्या काळात कोणाला सूट मिळणार, काय नियम असणार याबाबत मार्गदर्शन करणारी नियमावली केंद्र सरकारने आज जारी केली आहे. या नव्या नियमावलीनुसार, सध्यातरी देशांतर्गत विमानसेवा बंदच राहणार आहे. तसेच मेट्रो आणि बससेवाही बंदच राहणार आहेत. या बरोबरच शाळा, कोचिंग अशा शैक्षणिक संस्थाही बंदच राहणार आहेत.
देशातील रेल्सेवा ही ३ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

एकूणच कोरोनाचा संसर्ग अधिक फैलावू नये म्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
दुसरीकडे अत्यावश्यक सेवेमध्ये हॉस्पिटल, मेडिकल, भाज्यांची दुकाने, फळांची दुकाने ही मात्र मागील प्रमाणे चालू राहणार आहे. मात्र ज्या भागांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आहेत त्या भागातल्या जनतेला घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. नागरिकांना घरपोच सोयीसोविधा देण्यासाठी शासन पावलं उचलण्याच्या तयारीत आहे.