Home राजकीय मंत्री रामविलास पासवान यांचे आजारपणामुळे दुःखद निधन

मंत्री रामविलास पासवान यांचे आजारपणामुळे दुःखद निधन

0

लोक जनशक्ती पक्षाचे नेते व केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची प्राणज्योत आज मालवली. त्यांचा मुलगा तसेच लोक जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी ट्विट करून याबद्दलची माहीती दिली. या ट्विटमध्ये चिराग पासवान अत्यंत भावुक झाले होते. ते ट्विटमध्ये म्हणाले की, “बाबा आता तुम्ही या जगात नाही आहात, पण मला माहितीये तुम्ही कुठेही असले तरी नेहमी माझ्या सोबत असाल.”

गेल्या शनिवारी रात्री पासवान यांची हार्ट सर्जरी झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत जात होती. दिल्लीतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्याच रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांचे वय ७४ वर्ष होते.

त्यांच्या अकाली निधनामुळे आगामी बिहार विधानसभा निवडणुकीवर चांगलाच परिणाम होणार असल्याचे मीडिया न्यूजमधून सांगण्यात येत आहे.