प्राईम नेटवर्क : ऑनलाईन फूड मागवणार्यांना पुन्हा एकदा धक्का बसणार आहे. तामिळनाडूत स्विगी या ऑनलाईन फूड सेवा देणाऱ्या कंपनी कडून पुरवलेल्या फूड पॅकेटमध्ये जखमेवर लावलं जाणार बँडेज आढळून आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या बँडेजवर रक्ताचे डागही आहेत. चेन्नईतील बालमुरगां यांनी रविवारी मोबाईल वरून स्विगी फूड ऍपच्या साह्याने एका हॉटेल मधून जेवण ऑर्डर केलं होतं. फूड सेवा पुरवणार्या स्विगी कंपनीने हि ऑर्डर ग्राहकाला पर्यंत पोहचवली. मात्र जेवण संपत आल्या नंतर जेवणात बँडेड वाढल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
मुरगन यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंट वरून या घडलेल्या सविस्तर प्रकारा बद्दल माहिती दिली आहे. स्विगी ऍपच्या साह्याने शहरातील मोठया एका हॉटेल मधून मी चिकन शेजवान नूडल्स हि डिश ऑर्डर केली होती मात्र त्यात वापरलेलं बँडेड आढळून आल्याचं त्यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये सांगितलं आहे. या बाबत या रेस्टोरंटला संपर्क करून तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या कडून त्याच स्विगी ऍप वरून दुसऱ्यांदा जेवण ऑर्डर करण्याचा पर्याय सांगितलं गेला. अशा परिस्थिती स्विगीशी थेट संपर्क होऊ शकला नाही. अशावेळी ग्राहकांना कंपनीशी संपर्क साधण्यासाठी पर्यायाची कमतरता दिसली.
दरम्यान स्विगी आणि इतर फूड सेवा पुरवणाऱ्या कंपन्या आणि संबंधित हॉटेल्स ग्राहकांना योग्य सेवा पुरवत नसल्याचं दिसून आलं. जेवण बनवताना आणि ते सर्व्ह करताना योग्य काळजी घेतली जाते का ? असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. मुरगन यांना स्विगी कंपनी कडून अद्याप कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.