भारतासह अनेक देश कोरोनाच्या विळख्यात सापडलेले असताना चीनला मात्र कुरापती करायला आयता मौकाचं भेटला आहे. भारत आणि चीन मधील सीमाभागात मागच्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात तणाव आहे.
LAC म्हणजेच प्रत्यक्ष नियंत्रण रेखेवर मागील आठवड्यात भारतीय सैनिक आणि चिनी सैनिकांच्या कमीत कमी ४ किरकोळ मूठभेडीच्या घटना घडल्या. चिनी प्रसारण वाहिन्यांनी असे वृत्त दाखवले आहे की चिनी सैन्य हे गलवन खोऱ्यात त्यांची गस्त अजून कडक करत आहेत, त्यांच्या मते या भागात भारतीय सैन्याने बेकायदेशीर बांधकामास सुरवात केली आहे.
वाढत्या सीमाभागातील तानावमध्येच पूर्व लडाखच्या पेंगोंग त्सो नदीच्या किनाऱ्यावर ९ मे रोजी तर सिक्कीम मध्ये ५ रोजी सैन्याची समोरासमोर चकमक सुद्धा झाली. सेनादल प्रमुख मनोज नरावने यांनी १४ मे रोजी या दोन्ही घटनांची पुष्टी प्रसारमाध्यमांना दिली.
उन्हाळ्याच्या दिवसात ज्या वेळी धुके आणि बर्फ कमी झालेला असतो त्यावेळी चीन सोबत अशा चकमकी हे नित्याचे आहे पण अशा वेळी दोन्ही देशांनी कशा प्रकारे सीमाभागातील तणाव कमी करावा यासाठी प्रोटोकॉल ठरवण्यात आला आहे. या नुसार दोन्हीं देश काम करतील असे वाटत असतानाच चीनने मात्र भारतीय हद्दीमध्ये त्यांचे हेलिकॉप्टर ने गस्ती घालण्यास सुरवात केली आहे.
चीनमधील माजी भारतीय राजदूत गौतम बंबावले यांच्या मते सिमाभागावरील ह्या चीनच्या हरकती हे भारताने सुरू केलेल्या चीनमधील आयात निर्बंध, कोरोना संकट तसेच भारताची सिमभागावरील बांधकामांची प्रगती यामुळे वाढलेल्या आहेत.