Home राष्ट्रीय वयाच्या ९०व्या वर्षी शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे निधन

वयाच्या ९०व्या वर्षी शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे निधन

0

भारताचे भूषण असलेले प्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि संगीतकार पंडित जसराज याचे वयाच्या ९०व्या वर्षी निधन झाले. आज १७ ऑगस्ट २०२० ला सकाळी अमेरिकेत न्यू जर्सीमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण यांसह बऱ्याच मोठमोठ्या पुरस्कारांचे ते मानकरी होते.

पंडित जसराज यांची मुलगी दुर्गा जसराज यांनी याबद्दलची माहिती दिली. या बातमीने संगीत क्षेत्रावर मोठी शोककळा पसरली आहे. अनेक नेत्यांनी व दिग्गजांनी ट्विट करून शोक व्यक्त केला.