Home राष्ट्रीय काँग्रेसचं सरकार आल्यास मुस्लिमांसाठी तिहेरी तलाक कायदा रद्द करणार : काँग्रेस

काँग्रेसचं सरकार आल्यास मुस्लिमांसाठी तिहेरी तलाक कायदा रद्द करणार : काँग्रेस

0

प्राईम नेटवर्क : तिहेरी तलाक विरोधाचा आता काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत फायदा करून घेण्याचा विचार केला आहे, लोकसभेत आमचं सरकार आलं तर, काँग्रेस तिहेरी तलाक हा कायदा रद्द करेल. दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या अल्पसंख्यांक अधिवेशनात महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुश्मिता देव यांनी हि घोषणा केली आहे. यावेळी या ठिकाणी राहुल गांधी सुद्धा उपस्थित होते. लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसकडून मुस्लिम कार्ड खेळल्याचे बोलले जात आहे.

यावेळी राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका केली, पंतप्रधान आज काल घाबरलेले दिसतात, त्यांच्या चेहऱ्यावर भीती दिसत असते. असं राहुल म्हणाले. अच्छे दिन आयेंगे असं भाजप कार्यकर्ते म्हणायचे, मात्र आता देशातील जनताच चौकीदार चोर आहे, असं म्हणत आहे. अशी टीका यावेळी त्यांनी केली. पंतप्रधान मोदी देशाला जात आणि धर्माच्या आधारावर तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांना जनता खाली खेचेल असं यावेळी राहुल गांधी म्हटले.

मोदी आणि आरएसएस चा खरा चेहरा समोर आल्यामुळे जनता आता त्यांना माफ करणार नाही, आणि यावेळी काँग्रेस जिंकणार असा विश्वास राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केला.