Home राष्ट्रीय कोरोनामुळे भारताची गगनयान मोहीम पडणार लांबणीवर!

कोरोनामुळे भारताची गगनयान मोहीम पडणार लांबणीवर!

0

भारताच्या पहिल्या गगनयान मोहीमेलाही कोरोनामुळे विलंब होण्याची शक्यता आहे. भारतात स्वातंत्र्याला २०२२ मध्ये ७५ वर्षे पूर्ण होतात त्या निमीत्ताने भारतातर्फे तीन अंतरीक्षांना अंतराळात पाठवले जाणार आहे.

त्या मोहिमे आधी अंतरिक्षात २०२० आणि २०२१ मध्ये आधी मानवरहित दोन याने अंतरीक्षात पाठवली जाणार आहेत. ह्या मोहिमेला २०२० पासून सुरुवात करायची होती. आणि २०२२ मध्ये मानवसहित यान अंतरिक्षात पाठवले जाणार आहे.

याचे नेतृत्व ISRO चे अध्यक्ष के. सिवन हे करणार आहेत. भारत डिसेंबर 2022 मध्ये मानवासहित अंतरीक्षात यान पाठवणार आहे. ISRO ची पूर्ण टीम याचा आढावा घेत आहे. त्यानंतर या विषयीचा अंतिम निर्णय जाहींर केला जाणार आहे.

यंदाच्या डिसेंबर मध्ये सुरू होणारी ही मोहीम कोरोनामुळे पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे ,त्यात चांद्रयान तीनचाही समावेश आहे. ही भारताची स्वदेशी तंत्राने होणारी पहिलीच मानवासहित अंतराळ मोहीम असणार आहे. त्यासाठीची तयारी इस्त्रोने सुरू केली आहे.