देशात कोरोनामुळे प्रचंड भीतीचं वातावरण असताना ‘तबलीग जमात’ आणि ‘मरकज’ चर्चेचा वादग्रस्त विषय ठरला आहे. याच जमातीच्या एका मौलवींचा एक ऑडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
“मरण्यासाठी मशिदीपेक्षा चांगली जागा अजिबात नाही”, असं वक्तव्य मरकजचे अध्यक्ष मौलाना साद याने केलं आहे. व्हायरल झालेल्या ऑडिओमध्ये मौलाना साद यांचा आवाज ऐकू येत असून या दरम्यान काही लोक खोकतानाही ऐकू येत असून त्याकडे लक्ष दिलं नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
“मशिदीमध्ये जमा होण्यानं आजार होईल, हा विचार मूर्खपणाचा आहे. अल्लाहवर विश्वास ठेवा! कुराण वाचत नाहीत आणि वर्तमानपत्रं वाचतात आणि घाबरून पळत सुटतात.अल्लाह यासाठीच काहीतरी अडचणी निर्माण करतो, कारण त्याला पाहायचं असतं की अशा परिस्थितीत माझा बंदा काय करतो?”, असं मौलाना साद म्हणाले.
“दरम्यान, जर कोणी पण म्हणत असेल की मशिदी बंद करायला पाहिजे, टाळे लावायला हव्यात कारण हा आजार वाढत जाईल तर अजिबात ऐकू नका,” असंही मौलाना साद याने म्हटलं आहे.